मिठी..
मिठी..
मिठी शब्दात मिठास आहे
उच्चारताना प्रत्यक्षता आहे
मिठी गोड प्रेमळ आहे
घट्ट मिटे ओठांची जादू आहे
मिठीत येई राजसा माझा
पिघळते दोघांचे तन मन
मदमस्त होते, शहारते जीवन
मिठीत सुखावते तेव्हा तन
वात्सल्याचे अमृत देते
आतुर बाळा आई मिठीचा
झरे मातृत्वाचे वाहे निरंतर
गोड हवासा स्पर्श मिठीचा
पती-पत्नीची मिठी
विसावतो असतो संसार
आहे नाते जन्मोजन्मीचे
परीपूर्ण होतो परिवार
मिठी मैत्रिची आपुलकीची
विश्वासाची जवळीकतेची
एकमेव नाते बनते कर्मातुनी
जवळीकता आहे कमालीची

