STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy Others

3  

Prashant Shinde

Fantasy Others

मिरची...!

मिरची...!

1 min
14.9K


ती गजकटी गज गामिनी

पहात होती वळुनी वळुनी

लटकेच झटके देत होती

बटांना ती वाऱ्यावरी उडवूनी


ती नाजूक ललना वाटली

असेल कुबेरा घरची मोलकरीण

तोरा असाच होता तिचा

जणू त्या घरची ती मालकीण


हट म्हणता झोंबली मिरची

नजर फिरली लयीत तिरची

लटकेच झटका उरात घुसता

पोटात कळ भय गोळ्याची


घडले पदकमलांचे दर्शन

माप ओलांडल्यावरी

खरेच ती मिर्चीच होती झोंबरी

कळले ती घरी आल्यावरी.....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy