मीडिया
मीडिया
व्हाट्सॅप फेसबुक गुगल
टेलीग्राम ट्विटर ई मेल
नाना तऱ्हेच्या भिंती!
मनोरंजन किती करती
देती खूपच माहिती !
पण मनी ही हुरहूर दाटे
वाटे अनामिकशी भीती!
चालले पुढे जग सारे !
मी एकटाच का मागे?
भय दाटे एकलेपणाचे
वाटे हवीशी नवी वाट
विसरु नये कुणी मलाही
म्हणूनी डकवतो भित्तीचित्रे!
नको अंधार उपेक्षेचा
राहीन मी उजेडात !
नको जगणे दुर्लक्षित
राहीन मी मीडियात!