STORYMIRROR

Suresh Kulkarni

Classics

4  

Suresh Kulkarni

Classics

पाऊस

पाऊस

1 min
5

वाजे पानोपानी
वाजंत्री थेंबांची
 
डराव डराव
बेडुक बोलती
सळसळ वारा
झरझर धारा
सर्वत्र झरती

 ढग आभाळी
 कुस्ती खेळती
 नारळी पोफळी
 मजेत झुलती

 कडकड वीजा
 भीती वाढवती
 ओहोळ नाले
 गर्वाने फुगले!

 पावसात तुम्ही
 कुठे हरवले?
आया बहिणी
 जाया मैत्रीणी
 काळजी करीत
 वाट पाहती!

 मधेच सुर्य
 लावी हजेरी
 आभाळी रंगांच्या
 उधळती लहरी!

 सुरेश कुळकर्णी

 २५मे२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics