STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

4  

Suresh Kulkarni

Inspirational

गुरुकिल्ली!

गुरुकिल्ली!

1 min
8

बांधूनी ठेवा 
आपुल्या मना
सोडू नका ते
कधीच मोकळे !

द्या चालना 
या डोक्याला
रीकामे ते
घर भुतांचे!

नाना कल्पना 
संकल्प विकल्प 
अखेर त्या 
साऱ्याच वल्गना ! 

रहा मस्त 
सदा व्यस्त 
सोडवा कोडी 
खेळा गेम!

गा गाणी 
करु नका
गाऱ्हाणी
ठेवा सदा 
स्वच्छ रहाणी 

चालत बोलत 
शरीर ना थकत 
एका ठायी 
सारे गंजत!

उपयोगी वस्तू 
हवी हवीशी 
निरुपयोगी 
नको नकोशी 

देत रहा तर 
पुन्हा मिळेल 
घेता घेता 
सारे संपेल!

आळसाने 
मेद वाढतो 
चटपटीत रहा 
फायदा होतो 

हीच किल्ली 
आहे यशाची 
दिर्घ निरोगी 
आयुष्याची 

सुरेश कुळकर्णी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational