मी शेतकरी
मी शेतकरी
दिवसभर शेतात राबणारा
मी तोच शेतकरी राजा
उन्हातान्हात घाम गाळून
माल पिकवतो ताजा
रक्त आमचे आटते खुप
त्या शेतीत राबताना
हात सुध्दा कापतो इळ्याने
भात पिक कापताना
कधी हमी भाव भेटत नाही
कष्टाने पिकवलेल्या धान्यालाही
कोरडी पडते जमीन माझी
मुकते जमीन पाण्यालाही
तुमचे पोट भरण्यासाठी मी
न डगमगता माझे काम करतो
हमी भाव नाही, पाऊसही नाही
तरी तुमच्यासाठी धान्य पिकवतो
जीवाशी खेळतो आम्ही शेतकरी
पण हार कधी मानली नाही
फांदीला लावलेला फास गळ्यात
पण फांदी कधी मोडत नाही
संप आम्ही करत नाही कधी
माझी जनता उपाशी बसेल
उपाशी राहुन जनता माझी
कुपोषित झालेली दिसेल
