मी नवयुवक भारताचा
मी नवयुवक भारताचा
गौरवशाली महान देश
घडविण्यास सज्ज झालो,
मी नवयुवक भारताचा
प्रगतीसाठी पुढे सरसावलो . १
निःस्वार्थ मनोभावनेने
करू या सेवा देशाची,
श्रमदान देऊन आज
धुरा सांभाळू या विकासाची. २
ध्यास घेऊन शिक्षणाचा
चारित्र्य घडवू या आपला ,
क्रांतिकारी यशस्वी योजनेने
विश्वविजयाचा मान देऊ देशाला. ३
या भारत मातेच्या सेवेस
करेन अर्पण वेळ शक्ती,
प्रबळ इच्छाशक्तीने माझ्या
ध्येय गाठून दाखवेन देशभक्ती. ४
बलवान निरोगी सशक्त मनाने,
धैर्याने, शौर्याने जाईन पुढे,
सुज्ञ नागरिक बनून आज
नेईन भारतास जगापुढे. ५
