STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational

4  

Sunita Anabhule

Inspirational

मी मतदान करणारच

मी मतदान करणारच

1 min
323

होय मी मतदान करणारच,

देशासाठी, देशविकासासाठी,

माझ्यातील चांगल्या बदलासाठी,

आपला देश वाचविण्यासाठी,

होय मी मतदान करणारच...


शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी,

सैनिकांच्या आत्मबलिदानासाठी,

लोकशाहीच्या मजबुतीसाठी,

झुंडशाहीला ठोकण्यासाठी,

होय मी मतदान करणारच .....


स्त्रीच्या त्याग व आत्मसन्मानासाठी,

"ति"च्या गौरव, आत्मबलिदानासाठी,

समस्त स्त्री शक्तीच्या सबलतेसाठी,

होय मी मतदान करणारच...


ढोंगी-लंपट नेत्यांना ठोकण्यासाठी,

सत्तालोलुपांना शिकवण्यासाठी,

भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ देशासाठी,

प्रगतीशील माझ्या देशासाठी,

होय मी मतदान करणारच ....


आणि................ तुम्ही ????


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational