मी माझाच मी
मी माझाच मी
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
का मज लागली गोडी नवी प्रेमातली
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
हा मंद गार वारा कसा लागला जिव्हाळा
कोण येऊन असा हा माझ्या भिडला मनाला
नाव काय त्याचं काय आहे हो ठिकाणा
असा छळतो मला तो येता स्वप्नात रात्रीला
ये ये ना प्रिये शोधू तुला आता कुठे
मी विसरू कसे तुझे रूप ते ये ना प्रिये
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
तू जाऊ नको दूर बघ मन हे व्याकुळ
ये ना प्रिये तू भेटाया मन झालया आतुर
कसं तुला सांगू मन सैरा वैरा पळे
तुला गमवाया मनी उठे भीतीचं काहूर
का छळते मला जीवघेणी ही तुझी आठवण
मी जगवू कसे फुलपाखरू प्रेमातले
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
का मज लागली गोडी नवी प्रेमातली
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे