STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Tragedy

3  

Nurjahan Shaikh

Tragedy

मी कामगार बोलतोय

मी कामगार बोलतोय

1 min
494

हो, मी कामगार बोलतोय,

व्यथा माझी समोर ठेवून.

काय करचाल वाचून हे? 

कामगार जगतोय घाम गाळून.


दोन पैसे खात्यावर होते, 

मुलांचे शिक्षण अर्धेच राहिले,

पोरी माझ्या बिलगत होत्या,

'बाबा, कसे हो वाटोळे झाले?' 


कुशल कामगार सगळ्यांना हवा, 

मग मेहनतीचा तरी मोबदला द्या. 

रात्रंदिवस घाम गाळेन, न चुकता, 

फक्त मला विश्वासाचा हात द्या. 


रोगराई पसरली, कारखाने बंद झाली, 

कधी केला का विचार कामगारांचा ?

मदत नाही पुरत आयुष्यभरासाठी, 

रोज लढा द्यावा लागतो इथे संघर्षाचा. 


आज आठवी सर्वांना कामगारांच्या व्यथा, 

अर्ध्या पगारात कसे भागवू सांगा मला? 

भगवान, एकच शक्ती आज मला दे तू,

मन माझे कर खंबीर, जगण्यास मला....

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy