STORYMIRROR

Prakash Wankhede

Inspirational Others

0  

Prakash Wankhede

Inspirational Others

मी बोलणारच

मी बोलणारच

1 min
261


माझ्या प्रिय देशावर

राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनो

विविधतेने नटलेल्या

सौन्दर्याने मढलेल्या

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या

माझ्या भारत देशाला

रक्तबंबाळ करण्याचा

प्रयत्न करू नका

तसे करण्याचा प्रयत्न केला तर

मी आवाज उठवणारच

कारण,

मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच


प्रत्येक नागरिक

वैज्ञानिक दृष्टिकोन जपतोय

स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतोय

खरं खोटं जाणतोय

अश्या सुज्ञ नागरिकांना

भोंदू बाबांनो, भविष्य बुवांनो

आपल्या दुकानाचे

गिऱ्हाईक बनवण्याचा

अंधश्रद्ध प्रयत्न करू नका

तसा प्रयत्न केला तर

मी तुमचं पितळ उघडं करणारच

कारण

मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच


माझा समाज

सुखाने नांदतोय,

एकोपा वाढवतोय,

नातेपण टिकवतोय,

माणुसकीने जगतोय

पण

करमणूकीच्या व्यापाऱ्यांनो

स्वतःच्या टीआरपीसाठी

असामाजीक, अप्रपंचीक अमानवी,

कार्यक्रम दाखवून

समाजात, संसारात,

तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका

तसा प्रयत्न केला तर

मी बंड करून उठणारच

कारण

मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच


माझ्या भगिनी, माता

आज प्रत्येक क्षेत्रात

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून

काम करत आहेत

स्वतःच्या पायावर उभं राहून

देशाच्या प्रगतीसाठी

हातभार लावत आहे

पण

नराधमांनो

त्यांच्या प्रगतीत अडथळा बनू नका

त्यांना तुच्छ लेखण्याचा

षंढपणा करू नका

तसे करण्याचा प्रयत्न केला तर

तुम्हाला भर चौकात

तुमची औकात दाखवणारच

कारण

मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच


सर्व धर्म समभाव आहे

एकमेकांच्या

सुखदुःखाचा भाग आहे

एकमेकांत सलोखा

मनात आपुलकी आहे

ना कोणता राग आहे

पण

जातीयवाद्यांनो, धर्मांधांनो

जाती-जातीत, धर्मा-धर्मात

तेढ निर्माण करण्याचा

दुही पसरवण्याचा

अराजकता माजवण्याचा

निचपणा करू नका

तसे करण्याचा प्रयत्न केला तर

चवताळून उठणारच

कारण

मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच


आजही या साहित्य क्षेत्रात

दिवसेंदिवस नव कवी

उदयास येत आहे

उत्तम लिखाण करत आहे

समाज प्रबोधन करत आहे

पण

त्यांचा अडसर ठरणाऱ्या

त्यांना दुय्यम समजणाऱ्या

प्रस्थापितांनो

जर तुम्ही नवोदितांच्या यशात

अडथळा आणण्याचा

असाहित्यीक प्रयत्न केला तर

मी विद्रोह करणारच

कारण मी भारतीय नागरिक आहे

आणि मी बोलणारच



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational