STORYMIRROR

Prakash Wankhede

Inspirational

4  

Prakash Wankhede

Inspirational

तो तिला पाहायचा

तो तिला पाहायचा

1 min
430

रोजच वेळेवर तो तिची वाट पाहायचा

बघताच तिला चेहरा त्याचा खुलून निघायचा

तो आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


तिची घरी यायची वेळ झाली की

तो परत ठरलेल्या जागेवर उभा राहायचा

तिला पाहायचा, खुष व्हायचा,

आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


ती कधी दिसली नाही तर

तो तिच्या घराजवळ जायचा

तिथे थांबायचा, ती दिसताच

माकडासारख्या उड्या मारायचा

आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


खूप दिवस हे असंच चालतं राहिलं

तो तिला पाहायचा, खुष व्हायचा

आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


ती त्याला कधीतरी एकदा प्रेमाने बघणार

या आशेवर तो जगत होता

तिच्या प्रेमात तो डोळ्यांना

दररोज मुसळधार करायचा

अलगद पापण्या झाकून

पुन्हा डोळ्यात आठवणींचा समुद्र साठवून

तो तिला पाहायला उभा राहायचा

तिला पाहायचा, खुष व्हायचा

आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


एके दिवशी त्याने ठरवले

तिची वाट पाहायची नाही

तिला न्याहाळायचे नाही

पण तिला पाहताच

तो क्षणार्धात विचार बदलायचा

तिला पाहायचा, खुष व्हायचा

आनंदाने नाचायचा

पण ती त्याला ढुंकूनही पाहत नव्हती


एके दिवशी तो आजारी पडला

तिचा चेहरा पाहायला मिळणार नाही

या विचाराने तोही निराशा झाला होता

पण रोजची वाट पाहणारा तो

तिला दिसला नाही म्हणून

तीच अस्वस्थ झाली होती

तिने आजूबाजूला त्याच्याबद्दल विचारणा करून

त्याला भेटायचे ठरवले


ती भेटायला येणार म्हणून

त्याचा आनंद गगनाला भिडला होता

ती समोर येताच, तो मात्र निःशब्द झाला

आणि मग तीच त्याला बोलली

"तुझं रोजच बघणं

माझी वाट पाहणं

मला जगण्याची उमेद देत होतं

कुणीतरी आपल्यावर प्रेम करतं

या विचाराने माझंही मन मला

तुझ्या प्रेमाची ग्वाही देत होतं"


मग तो ही हिम्मत करून

तिला हलक्या आवाजात म्हणाला

"सखे तुझी वाट पाहणे

तीच आपल्या प्रेमाची कहाणी आहे

आजपासून मी तुझा राजा, तू माझी राणी आहे".


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational