STORYMIRROR

Prakash Wankhede

Others

4  

Prakash Wankhede

Others

हा भारत देश माझा नाही

हा भारत देश माझा नाही

1 min
278

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून

लोकशाहीची हत्या करून

हुकूमशाहीला जन्म देणाऱ्या गद्दारांचा

हा भारत देश माझा नाही


विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या गुंडांचा

देशाला गरिबीच्या खाईत ठोकून

बेरोजगारी निर्माण करणाऱ्या आशिक्षितांचा

हा भारत देश माझा नाही


शेतकऱ्याला हमीभाव न देता

त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या जुलमी ठोकशाहीचा

पैश्यासाठी गुलाम झालेल्या पत्रकार दलालांचा

हा भारत देश माझा नाही


जातीला बढावा देणाऱ्या जातीयवाद्यांचा

सगळं काही डोळ्यासमोर घडत असताना

अन्याय सहन करून

सोज्वळतेचा आव आणणाऱ्या नामर्दांचा

हा भारत देश माझा नाही


माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध

मी बेधडकपणे व्यक्त होतोय

कारण,

सम्राट अशोक, शिवराय, तुकारामांच्या कार्याचा

हा भारत देश माझा आहे

भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांच्या क्रांतीचा

हा भारत देश माझा आहे

गाडगेबाबा, कबीर, प्रबोधनकारांच्या वाणीचा

हा भारत देश माझा आहे

बुद्ध, फुले, शाहू आंबेडकारांच्या विचारांचा

हा भारत देश माझा आहे


Rate this content
Log in