STORYMIRROR

Prakash Wankhede

Others

4  

Prakash Wankhede

Others

आझादी मिळवत राहणार

आझादी मिळवत राहणार

1 min
322

कालही तुम्ही भ्याड हल्ले करत होता

आजही तुम्ही भ्याड हल्ले करत आहात

आम्ही कालही लेखणीने उत्तर दिले

आजही लेखणीनेच उत्तर देणार

होय, आम्ही आझादी मिळवत राहणार


आदिलशाही,

निजामशाही,

मोगलशाही संपवणारे आम्ही

पेशवाईला गाडणारे आम्ही

इंग्रजांना झुकवणारे आम्ही

शूरवीरांची जात आमची

आम्ही शूरवीरांसारखे लढत राहणार

होय, आम्ही आझादी मिळवत राहणार


भारताच्या सीमेची,

भारतातल्या लोकांची जबाबदारी आमची

महार बटालियन,

मराठा बटालियन,

शीख बटालियन,

इत्यादी बटालियन

तुमचं काय घंटा

कालच्यासारखे तुम्ही आजही पळकुटेच राहणार

आमचा संघर्ष जारी राहणार

होय, आम्ही आझादी मिळवत राहणार


माणुसकीची जात आमची

माणुसकीचा धर्म आमचा

माणुसकीचा वसा आम्ही

जातीचा कोणताही भेदभाव न करता

आम्ही माणूसपण जपत राहणार

होय, आम्ही आझादी मिळवत राहणार


बुद्धाचे अनुयायी आम्ही

अशोकाचा वारसा आम्ही

शिवशाहीची रयत आम्ही

भीमरायाचं संविधान आम्ही

आमच्या हक्कासाठी

आमच्या अधिकारासाठी

आम्ही दिवसरात्र झटत राहणार

होय, आम्ही आझादी मिळवत राहणार



Rate this content
Log in