STORYMIRROR

Prakash Wankhede

Romance

3  

Prakash Wankhede

Romance

तळमळ

तळमळ

1 min
15.5K


तव प्रेमासाठी सखे माझी तळमळ किती

दूसरीसवे मी दिसता तुझी जळजळ किती


मी पाहताच तुला तू मुखडा सारतेस बाजूला

गर्दीत मला पाहायची तुझी वळवळ किती


तो निसर्गही आसुसलाय आपल्या मिलनाला

प्रेममय अलिंगनासाठी तुुझी सळसळ किती


देखावा नाही केला तू माझ्यावरील प्रेमाचा

माझे मन जिंकण्यासाठी तुझी धडपड किती


मी न दिसल्याची भावना दिसे तुझ्या चेहऱ्यावर

मज जीवनसाथी करण्या तुझी कळकळ किती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance