मी अनुत्तरी
मी अनुत्तरी
मी गाठली सत्तरी जरी
वयोवृद्ध असलो तरी
भावना त्याच नाही का?
कुणी जाणेल तरी?
बाळास असते गरज मायेची
वृद्धपकाळी नाही का तयाची?
ही उणीव कळेल का,
कधी कुणास तरी?
म्हातारपण असते भावूक
पण त्यांनाच ठाऊक
या भावुकतेची जाणीव
होईल का कधीतरी?
तरुणपणी असते प्रतिष्ठा
उतारवयात उतरते निष्ठा
असं का व्हावं..?
वयोवृद्ध मी अनुत्तरी..!!
