महफिल
महफिल
कुणीच नसतं माझ्या सोबत
मी एकटा असताना...
अगदी मीही नसतो
असते फक्त निरव शांतता
इतकी की माझ्याच हृदयाची स्पंदने
पोहचतात माझ्या कानापर्यंत
शांत वाटत असतं सगळं तोच
आठवतेस....तू
अन् वाजतात मनात संतूर चे स्वर
दूर कुठेतरी ऐकू येते बासरी
किणकिणते कुठल्यातरी
देवळातली घंटा
एकापाठोपाठ असे मंजूळ स्वर
येत असतात तुझ्या आठवणी सोबत
आणि क्षणभरापुर्वीच एकटा
असणारा मी अनुभवतो
एक सुंदर महफिल
तुझ्या आठवणीं सोबत....
