माणूस
माणूस
1 min
206
कणाकणाने घडतो माणूस
प्रेमामध्ये पडतो माणूस
नकार जरासा आल्यावरती
थोडासा गडबडतो माणूस
तिने पहावे त्याला म्हणूनी
कितीक तो धडपडतो माणूस
कला कितीक अंगात तरीही
इथे कशाला सडतो माणूस
पाहून त्यांची श्रीमंती ती
उगाच मग अवघडतो माणूस
महागल्यावरी मदिरा येथे
वासाने लडखडतो माणूस
