आई
आई
जेव्हा फुलते बागेमध्ये जाई
मला आठवते तेव्हा माझी आई
बोट धरूनी चालावया शिकवले
चालल्यावर जोरात मग पळवले
तिची कधीही होत नसते भरपाई
मला आठवते नेहमीच माझी आई
अ आ इ ई गमभन शिकवले
मन माझे गिरवावयात रमले
शिकवण्यात त्या कधीच नव्हती घाई
मला आठवते नेहमीच माझी आई
आई आणि लेकरू जेव्हा बघतो
मनात मी तेव्हा खरेच रडतो
आठवण तिची कधीच जात नाही
मला आठवते नेहमीच माझी आई
