STORYMIRROR

Deepak Kambli

Inspirational

4  

Deepak Kambli

Inspirational

जयहिंद

जयहिंद

1 min
257

ती ही आपल्या सारखीच माणसं असतात

जी देशासाठी मरतात

फरक इतकाच की आपलं देशप्रेम हे

२६ जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट

पुरतच मर्यादित असतं


त्यांचं तसं नसतं ते १२ महिने २४ तास

देशप्रेमाची माळ हृदयी जपतात

त्यांचं शिक्षण आपल्यासारखच

पण त्यांचे संस्कार मात्र वेगळे असतात


आपण डिजे डिस्कोत रमतो

पण त्यांची आवड म्हणजे

देशप्रेमाची गाणी असतात


आपण कथा कादंबऱ्या वाचत असतो

ते मात्र देशभक्तांची चरित्रे वाचतात

आपल्याला गाडी, बंगला, यांची स्वप्ने पडतात

त्यांना मात्र स्वप्नात वर्दी, परेड, तिरंगा, दिसत असतो


पहिल्यांदाच ते जेव्हा वर्दी चढवतात तेव्हा

ते छातीवरील तिरंग्याला वंदन करतात

शेवटी शहिद होऊन तिरंग्यात लपेटून

घरी परत येतात

बसं!... इतकाच फरक असतो त्यांच्यात अन्

आपल्या नत......... जयहिंद 🇮🇳


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational