कविता
कविता
1 min
209
कविता मनात आहे
कविता जनात आहे
कविता कुणास येथे
कळली अशात आहे
कविता अबोल आहे
कविता सुडोल आहे
कळली जयास त्यांना
कविता सखोल आहे
कविता कुराण आहे
कविता सुजाण आहे
हे धर्म जात भाषा
कविता अजाण आहे
कविता अशीच माझी
कविता सुखीच माझी
कविता अशी जणू की
कविता सखीच माझी
