बांधली मी...!!!
बांधली मी...!!!
1 min
306
बांधली घट्ट मी अंतरीची रशी
पीळ नात्यातली ना सुटावी अशी
आज डोळ्यात या साठली आसवे
झोप यावी कुणाला तरी ती कशी
भान विसरून तो झोपतो पण कसा
ही उशी घेतली बघ ढगाची जशी
सारखे आठवे रूप येथे तुझे
बदलतो मी अता ही कुशी बघ शशी
स्वप्न आहे म्हणे एक बावनकशी
अनुभवाच्या मुशी घालुया रसरशी
तू अधूराच असशील माझ्याविना
नेहमी बोलते हे कपाला बशी
