STORYMIRROR

Dipaali Pralhad

Inspirational

3  

Dipaali Pralhad

Inspirational

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली .

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली .

1 min
161

सृष्टीचे सृजन माझ्या अंगी 

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी   


मुक्या भावनांना शब्द देते मी 

अबोल स्वप्नांची भाषा डोळ्यात जागवते मी 

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी   


निराकार आकार घेतो माझ्यात 

वंशबीज उदरी नऊ मास 

जन्म देण्यास जोपासते माझ्यात  

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी 


मीच माता मीच गृहिणी 

मीच अर्धांगीनी मीच कुलवधु 

विश्वास मी , प्रेमाची अबोल 

निःस्वार्थ परिभाषा मी 

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी  

 

 मायेची ऊब माझ्या हृदयी 

अंगी सप्तसुर संगीत प्रपंचाचे 

भावनांची हळवी कोंब पालवी 

मीच सखी सावली माझी

भान राखत आयुष्याची 

मर्यादा जपत सार्थ जन्माची 

म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी 

©दिपाली प्रल्हाद   

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational