म्हाताऱ्याची शिकवण
म्हाताऱ्याची शिकवण
तुह्या प्रेमाचे बाण माह्या हृदयात घुसते,
प्रेमाचे जग जणू स्वर्गासारखे भासते.
माह्या आंगातली पटकन जाते सुस्ती,
बघुन तुझ्या डोळ्यातली नटखट मस्ती.
तेच तुझे डोळे जेव्हा कधी अंगार ओतते,
तेव्हा माह्या मनाचा तोल झटकन सुटते.
मग मला जणू पृथ्वी हादरल्यासारखी वाटते,
तुझ्या विराट रुपाने मन माझे जणू फाटते.
जेव्हा तू श्रृंगार करुण सजते,
तुह्या डोळ्यातून अथांग प्रेम रिसते.
जेव्हा तुझ्यात दुर्गेचे उग्र रुप झळकते,
तेव्हा मला भर उन्हात थंडीने गारठा भरते.
तुह्या डोळ्यात जेव्हा राधेचे प्रेमरुप दिसते,
तेव्हा मला भर थंडीत घाम सुटते.
मग मला म्हाताऱ्याचं बोलणे आठवते,
अरे घरची बाई म्हणजे आगीचा गोळा असते.
लक्षात ठेव रोज पुरणाची पोळीचे जेवण भेटत नसते,
म्हणूनच दोघांचा संसार काही पोट्याचा खेळ नसते.
