STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

4  

Rohit Khamkar

Tragedy

म्हातारा

म्हातारा

1 min
985

म्हातारा म्हणूनच की काय, जड झालोय तुम्हाला.

आयुष्य गेल कमावण्यात, आता अवहेलनेचा घास आम्हाला


अपमानाची सवय झालीय, प्रेमाच्या या गोडीला

म्हाताऱ्या सोबत म्हातारी रड्तेय, वाटणीच्या या जोडीला



जोडीदार शेवटपर्यंतची, साथ सतत देणार.

वाट बघतोय आता, आधी मरण कोणा येणार



मरणाची भीती नाही, आज नाहीतर उद्या येईल

श्वास शेवटचा घेतानाही बाप तुझा, फक्त आशीर्वाद देईल



वय वाढलं म्हणून समजू नका, पाय पुसनीचा पोतारा

कधी काळी तरूण बाप होता, हाच म्हातारा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy