महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती विशाल आणि समृद्ध
संस्कृती जपण्यात संतांचा फार मोठा वाटा
अभंग,ओव्या,भजन आणि कीर्तनातून त्यांनी
जातीभेद विसरून मार्ग दावीला भक्तिसाधनेचा
जशी आहे महाराष्ट्रात संतांची परंपरा
तशीच आहे परंपरा साहित्यिकाचीही
ज्ञानेश्वरानी मराठीतूनच ज्ञानेश्वरी लिहून
दिली प्रचीती त्यांच्या अनमोल साहित्याचीही
महत्व आहे मराठी माणसाच्या पोशाखाला
सणवार एकत्र येऊन साजरे करण्याला
महाराष्ट्राच्या संस्कृतीत महत्त्व आहे श्रद्धेला
देवदेवतांच्या पूजा अर्चनेला परंपरा जपण्याला
महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहे,
संगीताचीही एक खास वेगळी परंपरा
तमाशा हा लोकसंगीताचा प्रकार हे वैशिष्ट्य
शाब्दिक काव्यातील लावणी आणि पोवाडा
मराठी माणसाच्या स्वभावाचे खास आहेत पैलू
जेथे जपला जातो आदरभाव,सन्मान आणि स्वाभिमान
महाराष्ट्र हे राज्य महान व्यक्तींचे राज्य
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आम्हा महाराष्ट्रीयांना अभिमान
