STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

महाराष्ट्राचा पोवाडा

महाराष्ट्राचा पोवाडा

1 min
211

धन्य,धन्य महाराष्ट्राला 

मराठी भाषेला,मराठी माणसाला 

मराठी राज्याला,मराठी मनाला,राजभाषेला जी जी जी 


महाराष्ट्र पसरला चौफेर 

डोंगर रांगाचे माहेरघर 

रक्षक अरबी अथांग सागर 

महाराष्ट्राचे वैभव असे थोर 

ऐतिहासिक वास्तू या पवित्र भूवर जी जी जी 


गोदावरी,कृष्णा,कोयना नद्यांचे उपकार 

दिले पाणी महाराष्ट्राला भरपूर 

केले सुखी,समृधी महाराष्ट्राला धरतीवर 

महाराष्ट्र नाही कधी विसरणार जी जी जी 


खानदेश, मराठवाडा, लोकजीवन 

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण 

मराठी भाषा त्यांची बहीण 

अतूट जिव्हाळा मनापासून जी जी जी 


मायभूमी महाराष्ट्राची, कामगारांची 

थोर पुरुषांची, क्रांतीकारकांची 

गोरगरीब जनतेची, विचारवंताची जी जी जी 


लाभले मोठेपण संतांचे, संत ज्ञानेश्वरांचे 

संत तुकोबांचे, गाडगेबाबांचे, संत तुकडोजींचे 

संत मुक्ताबाईंचे, संत मिराबाइंचे जी जी जी 


वारसा लाभला शिवाजी महाराजांचा 

शाहू,फुले, आंबेडकरांचा,सावित्रीबाईंचा 

शिक्षणमहर्षी,कर्मवीर भाऊरावपाटलांचा जी जी जी 


जोडीला लेखणी शाहीरांची,साहित्यिकांची 

कलाकारांच्या अभिनयाची,चित्रकारांच्या चित्रांची 

संताच्या विचारांची,प्रबोधनकारांची जी जी जी 


वरदान लाभले गुणवंतांचे महाराष्ट्राला 

थोर शास्रज्ञ मिळाले राज्याला 

इतिहासातील संशोधनाला 

महान राष्ट्र महाराष्ट्र संबोधण्याला जी जी जी 


संजय सोनवणे गातो पोवाड्याला 

नाशिक जिल्ह्याला,निफाड तालुक्याला 

मांजरगावाला,मुजरा मानाचा महाराष्ट्राला जी जी जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational