महाराष्ट्राचा भूमिअभिलेख दिन
महाराष्ट्राचा भूमिअभिलेख दिन
महाराष्ट्राचा भूमिअभिलेख दिन....!!
भूमी अभिलेख म्हंटल की
लगेच डोकं गरगरत
अगदी खाडा खोडी पासून
ते चिरी मिरी पर्यंत फिरून येत...
विश्वास म्हणजे काय
तो कोठे कोणत्या गावात राहतो
इथून सुरुवात होते आणि
नको ती बिरुद भूमी अभिलेख माथी घेतो...
पण खरं सांगू
बांधावरची कटकट वादविवाद
भूमी अभिलेख मिटवतो
आणि गुण्या गोविंदाचं जीवन
सामान्यांना बहाल करतो
आजच्या राष्ट्रीय भूमी अभिलेख दिनी
आमच्या मोजणीची आठवण होते
तेंव्हा मात्र त्या सर्वांचे कौतुक आणि
आभार मानून ऋण फेडण्यासाठी लेखणी पाझरते...
असाच भूमी अभिलेख महाराष्ट्राचा
चिरंतन चिरंजीव राहू दे
प्रामाणिक पणाचा डंका यांचा
त्रिलोकात सदैव घुमू दे...!!
सर्व ज्ञात अज्ञात भूमिअभिलेख विभागातील
प्रामाणिक हातांना भूमिअभिलेख दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!!!
