Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Snehlata Patil

Inspirational

3  

Snehlata Patil

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
198


हा महाराष्ट्र माझा

शिरपेचात तुराच साजा

परस्त्रीस माता समजा

शिवबा इथला राजा


आमचा मराठी बाणा

धर्म, पंथ, एक जाणा

वीरांच्या शौर्याच्या इथे

उमटल्या पाऊलखुणा


हा महाराष्ट्र गडांचा

निनाद इथे चौघडांचा

शाहिरांच्या पोवड्यांचा

अन् लावणीच्या फडांचा


हे राष्ट्र शिवबांचे

माझ्या थोर जिजाऊंचे

धर्मासाठी प्राणांची बाजी दिली

अशा थोर शंभूराजांचे


माझा महाराष्ट्र थोर

इथे जन्मले क्रांतीवीर

घालविण्या इथला तिमिर

नाही केली जीवाची फिकीर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational