STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
364

या मातीचा गंध धूळीचा

नभ लावितो टिळा

सृष्टीस नव जीवन देतो

गर्जुनी महाराष्ट्र धर्म खरा


इंद्रधनूची कमान सुंदर

सह्याद्रीचा चुडा

कर्म तुकोबा मर्म सांगती

जावयास अवकळा


विविधतेचा स्वर्ग धरेवर

विवेक सिंधू घडा

मानवतेच्या मुक्तीचा

लढला इथेच लढा


शिवरायांची वीर भूमी ही

सर्वांग देखणी

पवित्र साऱ्या जगात अमुची

महाराष्ट्राची भूमी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational