Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Inspirational Others

3  

Mahesh Raikhelkar

Inspirational Others

"महाराष्ट्र माझा "

"महाराष्ट्र माझा "

1 min
442


भवानी माता जेथे वसती तो महाराष्ट्र माझा

विठ्ठल उभा जिथे  विटे वरती तो महाराष्ट्र माझा!


शिवाजी ची जन्मभूमी तो महाराष्ट्र माझा

संताची जी कर्मभूमी तो महाराष्ट्र माझा!


फुले-आंबेडकरांना जेथे पूजती तो महाराष्ट्र माझा

गौरी-गणपती ची जेथे भक्ती तो महाराष्ट्र माझा !


वेरुळ-अजिंठा लेण्यांची जेथे महती तो महाराष्ट्र माझा

शाहीर जेथे पोवाडे गाती तो महाराष्ट्र माझा !


गान कोकिळा जेथे राहती तो महाराष्ट्र माझा

क्रिकेटच्या देवाची जेथे वस्ती तो महाराष्ट्र माझा !


तालमीत जेथे चाले कुस्ती तो महाराष्ट्र माझा

फडावर लावण्यांची  जेथे मस्ती तो महाराष्ट्र माझा !


मराठी आहे जिथे माऊली तो महाराष्ट्र माझा

सह्याद्री ची जिथे पडे सावली तो महाराष्ट्र माझा !


तारे-तारकांची जिथे मायानगरी तो महाराष्ट्र माझा

साहित्यात ज्ञानपीठाची भरारी तो महाराष्ट्र माझा


शिक्षणाची  जिथे असे गंगोत्री तो महाराष्ट्र माझा

उद्योगधंद्याची जेथे जंत्री तो महाराष्ट्र माझा !


देशाच्या राजकारणात ज्याने उमटविला ठसा तो महाराष्ट्र माझा

समाजसेवेचा ज्याने घेतलाय वसा तो महाराष्ट्र माझा !


आर्थिक राजधानी देशाची  जिथे तो महाराष्ट्र माझा

देश- रक्षणा  सैनिक जिथे घडती तो महाराष्ट्र माझा !

देश- रक्षणा  सैनिक जिथे घडती तो महाराष्ट्र माझा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational