महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन
मराठी छाती घाबरत नाही
झेलते बेधडक गोळ्या
वाकड्या नजरेने पाहाणाऱ्या
मातीत मिळवते टोळ्या
फुकटचे काही मागतच नाही
स्वाभिमानी मराठी माती
हिसकावून कोणी घेऊ लागला
तर समशेर तळपते हाती
पराक्रमाचे बाळकडू तर
इथल्या प्रत्येक घरात आहे
तुळशीचे अन वृंदावन
मांगल्यरूपाने दारात आहे
मर्द मराठी महाराष्ट्राचा
आज दिवाळी सण आहे
स्थापनेचा सोहळा म्हणजे
हुतात्म्यांनी जिंकलेला पण आहे !

