STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Tragedy

2  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

महापुर

महापुर

1 min
445

( चाल : बाप्पा मोरया रे . .. )

उरले पुरातले फक्त घावं 

दगडावर कोरलेल गावाच नाव॥ धृ॥


गेलं पुरात वाहून गांव

तोडलं हंबरून गाईन दावं

कुणी रंक ना उरला रावं

गळून पडला माणसाचा भावं


निसर्गाची तुटून पडली जाई

म्हणून पुरान केली घाई

वाहले माणस कुणाची आई

लेकरं रडले ढाई ढाई


गेले पुरात वाहून पारं

नाही उरलं दुकान न शेतवारं

पडली उघड्यावर लहानगी पोरं

पुरा इस्कटला संसार


याशी पुण्य ना पापाचा थारा

असमतोल संदेश देऊन गेला न्यारा

बेभान कोसळल्या पावसाच्या धारा

सगळा उपाय रायला कोरा


किती तोडली माणसा तु झाडं 

लावला जीवाशी स्वतःच्या घोरं

आता नदीला नदीशी जोडं

मग सुटलं पुराचं कोडं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy