महामानव...
महामानव...
भीमा तुझ्या जन्मामुळे
झाला उद्धार जनाचा
हक्क दिलास तू त्यांना
खऱ्याखुऱ्या आयुष्याचा...१
जाळीलेस अज्ञानास
ज्ञान दिले केली रक्षा
लवूनिया ज्योत अशी
उजळल्या दाहीदिशा...२
संविधान रचुनिया
सुखी जनतेस केले
क्रांतिसूर्य तू ठरला
समतेचे हक्क दिले...३
भरतरत्नाने तुज
देशाने रे गौरवले
दलितांच्या दुखण्यास
तूच दवापाणी केले...४
भारताचा शिल्पकार
तूच रे महामानव
स्वाभिमानी धैर्यवान
तूच खरा भीमराव...५
