मग चालते जिवन गाणं
मग चालते जिवन गाणं
मृदगंध पावसात
ओढा जातंय ग भरून
सखी ये ना विचारात
भाव पानी थोपून
हे पानी ते पानी
खुलवतात ग बाग
प्रेमाचंच हे रूप
घे ना तु जाणून
मृदगंध पावसात
गाणं जगण्याचं जन्मतः
बीज प्रेमाचे रुजवुनी
मन शेतामंधी न्हाहून घेऊ वाण
मन मनसोक्त चिंब भिजूनी
होउदे आपलं हिरवं रान
गाते पक्षी सृष्टीत मनभोर
प्रफुल्लित अंतरीं सुखाचं राग
धून स्वराची जुळत
थेबां थेंबात घडते कमाल
मग चालते जिवन गाणं
ऊन सावलीत पकडून ताल
