STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मेरा देश महान

मेरा देश महान

1 min
421

मेरा भारत महान

मेरा भारत महान....।।धृ।।


झाडे लावा झाडे जगवा

मंत्र दिला महान

प्रत्येकाने घेतली

देशासाठी आण।।१।।


गोष्ट असली जरी सान

होऊ देत मनोमनी जाण

इथे नाही प्रचारास वाण

चला सोडू प्रगतीचा बाण।।२।।


झाले गेले विसरून जाऊ

पाठीवरती सारा भार घेऊ

हरितक्रांतीसाठी पुन्हा

चला एकदा सज्ज होऊ ।।३।।


झाडे लावू झाडे जगवू

साक्षर सारा देश करू

हाती वृक्षारोपणाचे कार्य घेऊ

कसर चला पुन्हा भरून काढू।।४।।


जगतास या दाखवून देऊ

तोडले ते पुन्हा उगवू

आंनदाने पुन्हा पुन्हा म्हणू

मेरा देश महान, मेरा देश महान।।५।।

मेरा भारत महान

मेरा भारत महान....।।धृ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational