Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anupama TawarRokade

Fantasy

4.3  

Anupama TawarRokade

Fantasy

मेळ दागिन्यांचा

मेळ दागिन्यांचा

1 min
476


गोड गोजिरे लुटुपुटीचे

झाले भांडण आज दागिण्यांचे

गुपचूप मी एकत होते त्यांचे

लपून कोनाड्यात बोल साऱ्यांचे


आज भरली होती सभा दागिण्यांची

साऱ्यांची रंगत चढली बोलण्याची

कोण श्रेष्ठ कोणास मागणी मोलाची

कोणास मान कोण किती तोलाची


चंद्रहार अन् राणीहार होते एटीत

बोरमाळ अन कठींमाळ होते डोलत

मराठमोळी ठूशी अन् पांचाली सोबत

मंगळसुत्रातले काळे मणी खुदकन हसत


बांगड्या आणि पाटल्यांची होती खणखण

कर्णफुले हुजूर,पानबाळ्या सोण्याची खाण

नथ आणि बिंदी बोर म्हणती आमचा मान

नथ म्हणे मीच सौंदर्याची शान


भांगसर वेणी आंबाड्यातील फुले

अग्रफुल बोले माथ्याच्या मध्यभागी झुले

वेणीच्या प्रत्येक पेरात चमकी डोले

भांगात मळवट माझे स्थान बोले


हळदकुंकू म्हणती आम्हास मान कपाळी

गजरा म्हणे मज साऱ्या केसात माळी

नवरत्न हार म्हणे मी सजलो गळी

ओठांची लाली बोले मज शेजारी खळी


साऱ्यांचे चालले उणेदुणे असे

अंगठी तोऱ्यात बोटावर बसे

कंबरपट्टा अन् छल्ल्याची रूणझुण

चाळ पायातली वाजे छणछण


तोडे, जोडवे पायात लई भारी

अंगठा मासोळीची मजाच न्यारी

पंच जोडव्याची पायी सणवारी

पायी पैंजण घाले प्रत्येक नारी


काजळाची ऐकू आली कुजबूज

नखरंग घालीत होते हळूवार गुज

मैफल जमली रंगत वाढली आज

मी एकत होते साऱ्यांचा आवाज


सारे आहेत येथे आज समान

मी देते रीतीरीवाजा प्रमाणे मान

तुम्ही माझी आवड देता मज भान

प्रत्येक दागिना आहे माझी शान


Rate this content
Log in