STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

मेघराजा

मेघराजा

1 min
249

मेघ राजा कर आता गर्जना...

टप टप थेंब पडू दे,

मला जरा चिंब होऊ दे,

गाली माझ्या हसू उमलू दे,

अशी सुखी मला पाहशील ना? 


मेघराजा कर आता गर्जना... 

दूरवर हिरवळ दाटू दे,

त्यातून पीक येऊ दे, 

पिकातून मोती उसळू दे,

होत्याचं हसू माझं पाहशील ना? 


मेघराजा कर आता गर्जना...

रोमारोमात पाणी खेळू दे,

त्या पाण्याने तृष्णा माझी भागू दे,

साऱ्या जगात मला मोहरून जाऊ दे,

मेघ होऊन माझ्यावर, प्रिती तू करशील ना? 


मेघराजा कर आता गर्जना... 

आभाळाची माया तू मला दे, 

तुझ्या प्रीतीचा गंध ऊधळू दे,

त्या गंधात न्हाऊन जाऊ दे, 

तुझ्या कुशीत मला तू घेशील ना? 

मेघराजा घर आता गर्जना.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational