मेघ
मेघ
कृष्ण मेघासह जलपरीचे
हसतच आगमन झाले
गंधाळले आषाढ वारे
अमृत मेघ घेऊन आले
थेंब प्राशिला चातकाने
विठाई प्रसन्न भासली
खळाळले रानी पाणी
काळी माय रे हासली
मुरत गेले पाणी खोल
गर्भात बीज अंकुरले
अन्नदाता हर्षीत पहा
वीजेने नृत्य साकारले
तृषार्त जीव तृप्त झाले
हिरवी पताका लहरली
शितल गारवा मनात
सुमने जाईची बहरली
स्वर्गातली जल अप्सरा
देई ओंजळीत जीवदान
छान अविस्मरणीय भेट
हिरवेगार मनाचे पान
