STORYMIRROR

Mita Nanwatkar

Classics

4  

Mita Nanwatkar

Classics

मेघ दाटले

मेघ दाटले

1 min
405

आसमंती मेघ दाटले

वाटे ते रूप देखणे

अलवार उतरूनी जणू

आले मनात चांदणे.....

टपोऱ्या थेंबात त्या

श्रावण हास्य दडलेले

माती अन् पाण्याचे

अनोखे नाते सजलेले...

ओलावलेल्या सुगंधात

हरेक श्र्वास गंधाळलेला

अनामिक सूर तालात

मनमयूरही नाचलेला...

पानाफुलांचा नवजन्म

इंद्रधनूचाही रंग नवा

मोहरलेल्या भावनांचा

प्रत्येक क्षण वाटे हवा...

प्रसन्नतेचा हा बहर

हृदयातील हिरवळ

क्षणात पळवतोय

गतकाळाची मरगळ...

मनाला चिंब भिजवणारा

हा मंदधुंद गारवा

गुदगुली करून गेला

अनामिक स्पर्श हळवा...

जगण्याची धुंदी देणारा

आयुष्यातला निराळा पाऊस

चैतन्यसरीत न्हावून गेला

आजचा कोवळा पाऊस....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics