मधुमिलन..
मधुमिलन..
माझ्या ह्रदयीचे स्पंदन
दिले केव्हाच तुला आंदन
नकळत कोरलेस तूही
काळजावर माझ्या गोंदण.
आठवते.., नकार दिलास
तेव्हा केले होते आंदोलन
मिटवून सारे प्रश्न लिलया
तू भरविले प्रीतसंमेलन.
रागावलीस तर फुलन
हसलीस की हेमामालन
मोगरा करतो मध्यस्थी
मग होतेच मधुमिलन..

