#मैत्री
#मैत्री
अशाच एका वळणावर
अनपेक्षित असे काही घडले
हुरहूर दाटे मनातली
स्वप्न कसे ते उलगडले
मंद पावले टाकीत एक एक
कशी दरमजल केलेली
स्पर्शानेही तिची ओळख
नजर जरी धुसर झालेली
हरवलेली ती मैत्री अताशा
शोधण्याची उम्मीद संपलेली
भेटण्याची जराही नव्हती आशा
पण ती समोर उभी ठाकली
पुढ्यात दिसता अचानक
निशब्द होई मन
पाहता परत तिला
रोम रोम येई शहारून
झाली पकड घट्ट
ठेवते अलगद कोंदणात
वाईट नजरेपासून लपून
राहू दे अशीच सुरक्षित
प्रा. सौ. नलिनी लावरे
