Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

मैत्री तुझी माझी

मैत्री तुझी माझी

1 min
187


तुझी माझी मैत्री

म्हणजे अथांग समुद्र 

वादळांवर वादळे झेलणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे

दीपस्तंभ

आयुष्य रुपी जहाजाला योग्य दिशा दाखवणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे रिमझिम बरसणारा 

पाऊस 

तन-मन ओलचिंब करणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे पौर्णिमेचा चंद्र

शितल प्रकाश देणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे निखळ हास्य 

सर्व दुःखं विसरायला लावणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे 

जणू संजीवनी 

जगण्याची नवी उमेद देणारी

तुझी माझी मैत्री म्हणजे ईश्वराचे रूप

संकट समयी शक्ती देणारी 

तुझी माझी मैत्री म्हणजे 

एक रेशमी बंधन  

कधीही न तुटणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics