STORYMIRROR

Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

आशेचा किरण

आशेचा किरण

1 min
9

हे ईश्वरा 

बहाल केलेस तू

 मातृत्व मला

पण देऊन जन्म

 कन्येला

 असा काय गुन्हा

 मी केला 

का जन 

कोसती मला 

पाहून ती सालस बाला 

ऊर माझा

 भरून आला

 कसे समजावू

 या मनाला

 नयनी माझ्या

अश्रू दाटला

 हे पाहून बोले

 ती सालस बाला

 जपेन मी

 तुझ्या मातृत्वाला

 बनेन मी सबला

 परी न

दूर लोटू मजला

 घे कुशीत

एकदाच मजला

आशेचा मज

किरण दिसला

कुशीत घेऊन

 दिले बळ पंखांना 

नाही डरणार

 जगाशी या 

लढणार

 किती होऊ दे

 आता वंचना.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics