दिवाळी
दिवाळी
दिवाळी म्हणजे
अमर भूपाळी
अभ्यंग
स्नानाची पहाट
सुगंधी उटण्याचा
दरवळणारा सुहास
प्रकाशाचा अंधारावरील
विजय
वासरावर
प्रेमाचा वर्षाव
करणारी गाय
दिव्यांची आरास
चमचमीत
फराळाची रास
रांगोळीने सजलेले
अंगण
दारावर शोभणारे
तोरण
शुभेच्छांची देवाण घेवाण
धन्वंतरी, कुबेर पूजन
लक्ष्मीचे आगमन
पती-पत्नी
बहिण भावांची
ओवाळणी
दिवाळी म्हणजे
मांगल्याची
आनंदाची पर्वणी.
शुभ दिपावली