STORYMIRROR

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

आम्रवृक्ष

आम्रवृक्ष

1 min
462


जरी जीर्ण झाला इथे आम्रवृक्ष

तरी कर्तव्यात सदा असे दक्ष।।१।।


असे छाटलेली डहाळी जयाची

तरी सोडली ना उभारी मनाची।।२।।


फळे गोड द्यावे जगाला सदाही

न सोडी स्वतःच्या गुणा तो कदाही।।३।।


असे जेवढा तो जोश खोडामधे 

फळांच्या रूपाने जगा देत जातो।।४।।


वाढते आयुष्य तनू क्षीण होते

पित्याच्या हृदयी ये प्रेम भरते।।५।।


सदा त्यास ठावे नेहमी झिजावे

असे ते मुलांना सदा देत जावे।।६।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics