STORYMIRROR

Archana Dhanorkar

Classics

3  

Archana Dhanorkar

Classics

हिरव्या रंगाचे धुमारे

हिरव्या रंगाचे धुमारे

1 min
200

नभी ढगांचे ग मळे

आसुसले रानतळे

पानं फुलं झिम्मा खेळे

गार वारा मज छळे..!!१!!


नभी दामिनी अधीर

मेघ मल्हार गावया

सरी बरसोनी करी

चिंब धरतीची काया..!!२!!


आभाळाच्या संचिताची 

एक एक असे सर

कूस उजवी मातीची

धरणी फेडी त्याचे ऋण..!!३!!


आले आले धरतीला

हिरव्या रंगाचे धुमारे

रानावनात घुमती

राघू मैनेचे तराणे..!!४!!


निळ्या आभाळावरी ग

राती चांदव्याची छाया

अंधारल्या नभावरी

असे नक्षत्रांची माया..!!५!!


तुझ्या माझ्या मनातल्या

बरसू दे ग पाऊसधार

सखी संगे हृदयीच्या

बघ झंकारती तारा..!!६!!


मन वेडावून धावे

तुझ्या कुशीत विसावण्या

रंग गंधात न्हाऊनी

अंतरंगी मोहरण्या..!!७!!


रंग गंधात न्हाऊनी

अंतरंगी मोहरण्या..!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics