आली दिवाळी आली........
आली दिवाळी आली........
उधळीत शतकिरणांच्या ज्योती...
आली दिवाळी आली...
कुंद कळ्यांच्या शुभ्र फुलांच्या..
धुंद सुगंधा प्याली...
आली दिवाळी आली...
सनई, चौघडा, रांगोळ्यांनी
दारी तोरणे ल्याली...
दिपमाळांचा प्रकाश लेऊन...
लक्ष्मी अपुल्या दारी....
आली दिवाळी आली...
मेघ बरसती स्नेह सरींचे....
तन मन हसरी झाली....
रात्रीच्या त्या चंद्र चांदण्या...
हळूच हसती गाली...
आली दिवाळी आली.….
आली दिवाळी आली....
