STORYMIRROR

Archana Dhanorkar

Others

3  

Archana Dhanorkar

Others

दिवाळीची आठवण...

दिवाळीची आठवण...

1 min
284

ऋणानुबंधांची प्रीती

कशी बहरून आली...

गोड सारी नाती

सुगंधात न्हाली...!!


रुसवे फुगवे सारे

कसे विसरूनी गेली...

अक्षय सुखाचा वर्षाव

करी एकमेकांवरी...!!


जात , धर्म, पंथ, भाषा

गळुनी विखुरली...

माणुसकीची ज्योत पुन्हा

प्रकाशित झाली...!!


मनामनातील काजळी

पणतीप्रकाशी सामावली...

आठवण दिवाळीची...

अजुनी मनात ओली...!!


आठवण दिवाळीची...

अजुनी मनात ओली...!!


Rate this content
Log in