Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amrapali Ghadge

Tragedy Classics Others

3  

Amrapali Ghadge

Tragedy Classics Others

असा एक सूर्यास्त

असा एक सूर्यास्त

1 min
125


हे मावळत्या दिनकरा 

थांबशील का रे जरा

पायवाट तुडवीत घाईने 

जाईन मी रे माझ्या घरा


अंधारात टपलेले सावज 

करतील माझी शिकार

घरट्यातील चिल्लीपिल्ली

शोधतील कोणाचा आधार?


हंबरतील गाई वासरे

कळ्या हिरमुसतील अंगणी

मिणमिणेल सांज दिवाही

दारात तुळशीवृंदावनी


लाल केशरी नभांगण 

क्षणात होईल धूसर

उगवशिल तू नव्याने मित्रा 

आयुष्यात उठेल माझ्या काहूर


माझा ही राणा असेल दाराशी

ओढ जशी तुला क्षितिजाची

भेसूर होईल सांजवेळ मग

समजूत घालू कशी मी मनाची


भय नाहीच तमाचे मजला,

ढसतात वखवखलेल्या नजरा

अस्तास रवी जातो पण

कित्येक मनात असतो धोसरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy